Connect with us

गोवा खबर

आयसीएल फिनकॉर्पने गोवा प्रादेशिक कार्यालय आणि पाच नवीन शाखांच्या भव्य उद्घाटनासह पश्चिम भारतातील उपस्थिती दृढ केली

Published

on

Spread the love

गोवा खबर : आयसीएल फिनकॉर्प लिमिटेड या भारतातील सर्वात विश्वासार्ह आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या नॉन-बँकिंग वित्तीय कंपनीने गोव्यात त्यांच्या प्रादेशिक कार्यालयाचे उद्घाटन करण्‍यासह राज्यभरात पाच नवीन शाखा सुरू करून महत्त्वाचा टप्पा गाठला.

पणजी कन्‍वेशन सेंटर, विस्‍तार इस्‍टेट्स, ४ पिलर हॉटेलसमोर, माला हेरिटेज एरिया, पणजी, गोवा येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या भव्‍य उद्घाटन कार्यक्रमामध्‍ये प्रमुख मान्‍यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात एलएसीसीटीसीचे गुडविल अॅम्‍बेसेडर आणि आयसीएल फिनकॉर्पचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अँड. के.जी. अनिलकुमार, कंपनीच्या सीएसआर उपक्रमांचे नेतृत्व करणाऱ्या आयसीएल फिनकॉर्पच्या पूर्णवेळ संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी उमा अनिलकुमार आणि एनआयडीसीसीचे राष्ट्रीय प्रशासक सुबिश वासुदेव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

नव्याने सुरू झालेले प्रादेशिक कार्यालय पणजी येथे आहे आणि त्याच्या शाखा पणजी, मडगाव, वास्को, मापुसा व फोंडा येथे आहेत, ज्यामुळे आयसीएल फिनकॉर्पच्या ग्राहक-अनुकूल वित्तीय सेवा गोव्यातील नागरिकांसाठी अधिक सहजसाध्य झाल्या आहेत. नुकतेच, आयसीएल फिनकॉर्पची भारत सरकारच्या अंतर्गत राष्ट्रीय उद्योग विकास परिषद समिती (एनआयडीसीसी)ची राष्ट्रीय कर्ज भागीदार म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे. या प्रतिष्ठित मान्‍यतेमधून कंपनीची दृढ विश्वासार्हता आणि राष्ट्रीय विकास उपक्रमांना पाठिंबा देण्याप्रती कटिबद्धता दिसून येते.

या विस्ताराचा भाग म्हणून कंपनीने एनआयडीसीसी सहाय्यता केंद्र देखील सुरू केले आहे, जे स्थानिक उद्योजक, लघु व्यवसाय आणि लाभार्थ्यांना सरकारी योजना व आर्थिक उपक्रमांचा प्रभावीपणे लाभ घेण्यास मदत करण्यासाठी डिझाइन केलेली समर्पित समर्थन यंत्रणा आहे.

या लाँचला अधिक उत्‍साहित करण्‍यासाठी आयसीएल फिनकॉर्पने १०० अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी २५ शिलाई मशीनचे वितरण आणि वंचित कुटुंबांना ५०० तांदळाच्या किटची तरतूद यांसारख्या महत्त्वपूर्ण सीएसआर उपक्रमांद्वारे सामाजिक जबाबदारीप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ केली.

गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून आयसीएल फिनकॉर्प विश्वासार्हता, पारदर्शकता आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनासाठी ओळखली जाते. गोव्यात प्रादेशिक कार्यालय आणि पाच नवीन शाखांचे उद्घाटन कंपनीच्या वाढत्या ग्राहकांसाठी सुलभता व सुविधा वाढवण्याच्या दृष्टिकोनाला दृढता देते, तसेच सेवा उत्कृष्टतेच्या सर्वोच्‍च मानकांचे पालन करते. अॅड. के.जी. अनिलकुमार आणि श्रीमती उमा अनिलकुमार यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली हा नवीन अध्याय आयसीएल फिनकॉर्पचा गोव्यातील लोकांशी असलेला संबंध मजबूत करतो आणि याद्वारे वेळेवर, विश्वासार्ह व परिवर्तनकारी आर्थिक सोल्‍यूशन्‍स देण्याप्रती कटिबद्धता दिसून येते.