Connect with us

गोवा खबर

भाजप आमदार, मंत्र्यांच्या विधानसभेतील कामगिरीवर पक्षाचे बारीक लक्ष : दामू नाईक

Published

on

Spread the love

गोवा खबर : येत्या पावसाळी अधिवेशनादरम्यान भाजप आपले मंत्री आणि आमदार यांची विधानसभेतील कामगिरी बारकाईने पाहणार आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर (दामू) नाईक यांनी स्पष्ट केले. पक्षशिस्त पाळण्याबाबतही स्पष्ट संदेश दिला.

दामू नाईक म्हणाले, २१ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात आमदार आणि मंत्री काय भूमिका बजावतात, त्यांची उपस्थिती किती आहे, त्यांनी कोणते प्रश्न उपस्थित केले, यावर पक्षाचे लक्ष राहील.

त्यांनी हेही सांगितले, भाजपमध्ये शिस्तीला महत्त्व आहे. प्रत्येक आमदाराने ती पाळलीच पाहिजे.

मंत्रिमंडळ फेररचनेबाबत विचारणा केली असता, त्यांनी स्पष्ट केले की अधिवेशन संपेपर्यंत कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. सध्या सर्व आमदार आणि मंत्री अधिवेशनावर लक्ष केंद्रित करत आहेत, असे त्यांनी नमूद केले.