Connect with us

गोवा खबर

मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळाच्या देणगी कुपनाचा शुभारंभ 

Published

on

देणगी कुपन शुभारंभ करताना सरपंच अमित मोरजकर, देवस्थान अध्यक्ष रामनाथ शेट गावकर, अमित शेट गावकर, रुपेश शेट गावकर व इतर.
Spread the love

गोवा खबर : मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळ आणि मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा गणेश चतुर्थीच्या निमित्ताने देणगी कुपन उपक्रम राबवण्यात आला होता. त्या देणगी कुपन शुभारंभ मारना शिवोलीचे सरपंच अमित मोरजकर यांच्या हस्ते करण्यात आला. 

मोरजी येथील श्री कळसदेव मांगर सभागृहामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात यावेळी मारणा शिवोलीचे माजी पंच प्रवीण कोचरेकर मोरजाई देवस्थान समितीचे अध्यक्ष रामनाथ शेटगावकर मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अमित शेटगावकर, मोरजीचे पंच तथा माजी सरपंच सुरेखा शेटगावकर पंच विलास मोरजे पंच फटू शेटगावकर, मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष प्रसन्न कुमार शेटगावकर, देणगी कुपन प्रमुख रघुनाथ शेटगावकर, मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव उत्सव समितीचे अध्यक्ष रुपेश शेटगावकर आदी उपस्थित होते.

सर्वेश शेटगावकर, हरी नाईक, रुपेश शेटगावकर, घनश्याम मोरजकर आदींनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. स्वागत, प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन विकास आजगावकर यांनी केले. पाहुण्यांच्या हस्ते सुरुवातीला दीप प्रज्वलन आणि देणगी कुपनचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे मारणा अमित मोरजकर यांनी सांगितले, मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव उत्सव समितीमार्फत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्याविषयी राज्यभर त्यांची प्रसिद्धी होते. अशा उपक्रमात गणेश भक्तही मोठ्या प्रमाणात आर्थिक पाठबळ देत असतात. अशा उपक्रमांना आमचाही पाठिंबा मिळणार असल्याची ग्वाही यावेळी दिली.

 मोरजाई देवस्थान समितीचे अध्यक्ष रामनाथ शेट गावकर यांनी मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळाचे कार्य पूर्ण गोव्यात पोचलेले आहे. चांगले उपक्रम राबवले जातात. मोरजाई देवस्थान समितीकडून या मंडळाला महाजनांच्या संमतीने सर्वतोपरी सहकार्य मिळेल. अशी ग्वाही यावेळी रामनाथ शेटगावकर यांनी दिली. साबा च्यारी यांनी आभार मानले.