गोवा खबर : गोवा राज्य जैवविविधता मंडळाने पावसात रानातील रोईणवर येणाऱी अळंबी मोठ्या प्रमाणात न काढण्याची लोकांकडे मागणी केली आहे.

अळंबी जातीचा संरक्षण करण्यासाठी लोकांनी रोईणवर पन्नास टक्के अळंबी ठेवावी. रानात ‘ रोईणवर उगविणारी अळंबी मोठ्या प्रमाणात तोडल्यांने पर्यावरणाचा समतोल बिघडतो. आज अनेक अळंबीच्या जाती नष्ट झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे पुर्णपणे वाढ न झालेली लहान अळंबी काडल्याने पुढच्या वर्षी अळंबी उगविण्याचे प्रमाण कमी होत जाते. पुढच्या वर्षी अळंबी येण्यासाठी पूर्णपणे वाड झालेली अळंबी रोईणवर कुजली पाहिजेत आणि मातीत विरगळली पाहिजेत. तसेच बारीक अळंबी काढल्याने रोईणीतील अळ्यांना धोका निर्माण होतो आणि पर्यावरणाचा समतोल बिघडतो. पर्यावरणाचा समतोल बिघडल्याने माकड तापासारखा संसर्ग पसरण्याची शक्यता असते.
खाजगी वन मालकांनीही आपल्या रानातील रोईणवर उगविणारी अळंबी जातीचे संरक्षण करण्याचे प्रयत्न करावे असे मंडळाने कळविले आहे.