Connect with us

गोवा खबर

अनुसूचित जाती/जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत लॅपटॉप योजनेस अर्ज प्रक्रिया सुरू

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा सरकारने अनुसूचित जाती/जमाती समुदायातील विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल शिक्षण आणि शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी, दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप वितरण योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज सुरू केले आहेत.

माननीय आयटीई अँड सी मंत्री रोहन खंवटे यांच्या नेतृत्वाखाली, गोवा सरकारचे माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स खाते (डीआयटीई अँड सी) इन्फो टेक कॉर्पोरेशन ऑफ गोवा लिमिटेडद्वारे (आयटीजी) ही योजना राबवित आहे. २०२४-२०२५ शैक्षणिक वर्षातील पात्र विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी, अनुसूचित जाती (एससी) समुदायातील १० गुणवंत विद्यार्थी आणि अनुसूचित जमाती (एसटी) समुदायातील १० विद्यार्थी निवडून, प्रत्येक तालुक्यात मुले आणि मुलींचे समान प्रतिनिधित्व (प्रत्येकी ५) असेल.

*पात्रता निकष* :

*या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी*:

● अनुसूचित जाती किंवा जमाती समुदायातील असणे आवश्यक आहे.

● गोव्यात जन्मलेले असावे किंवा किमान एक पालक गोव्यात जन्मलेला असावा.

● पहिल्याच प्रयत्नात दहावीची परीक्षा (गोवा बोर्ड) उत्तीर्ण झालेली असावी.

● दहावीत एकूण ७०% गुण मिळवलेले असावे.

● ज्या तालुक्यात त्यांना गुणवत्तेसाठी विचारात घेतले जात आहे, त्याच तालुक्यात शिक्षण घेतलेले असावे.

● तालुक्यातील पहिल्या ५ मुले किंवा पहिल्या ५ मुली अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळविलेले असावे.

*आवश्यक कागदपत्रे* :

● जन्म प्रमाणपत्र (विद्यार्थी किंवा पालकांचे)

● दहावीची गुणपत्रिका (गोवा बोर्ड)

● जातीचे प्रमाणपत्र (साक्षांकित प्रत)

● पालकांचा संमती अर्ज (अनेक्स्चर I)

● विद्यार्थ्याचे फोटो ओळखपत्र (आधार कार्ड/शाळेचे ओळखपत्र)

● स्वाक्षरीसह पालकांचे ओळखपत्र (पॅन/पासपोर्ट/ड्रायव्हिंग लायसन्स)

सर्व पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान-चालित शिक्षण साधनांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी आणि डिजिटल अंतर कमी करण्यासाठी खात्याच्या सततच्या प्रयत्नांमधील हे एक पाऊल आहे.

पात्रता निकष पूर्ण करणारे विद्यार्थी infotech.goa.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२५ आहे.