गोवा खबर : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय आपदा प्रबंधन प्राधिकरणाच्या वतीने दरवर्षी आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेण्यासाठी वैयक्तिक आणि संस्थाना सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार देण्यात येतो. प्रत्येक वर्षी २३ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिनी हा पुरस्कार जाहीर करण्यात येतो.
२०२६ वर्षाच्या पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. १ मे २०२५ पासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ती ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत चालू राहील.
पुरस्कारासंबंधी अधिक माहिती आणि ऑनलाईन अर्ज नमुना http://awards.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.