Connect with us

गोवा खबर

 कला अकादमीवरून वाद कायम

Published

on

Spread the love

गोवा खबर : कला अकादमीचे अध्यक्षपद कलाक्षेत्रातील व्यक्तीलाच दिले जावे, अशी मागणी कलाराखण मांड संघटनेने केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारकडून पारदर्शक आणि कलाकार हिताची भूमिका घेण्याची अपेक्षा व्यक्त केली.

संघटनेचे नेते देवीदास आमोणकर म्हणाले, कला अकादमीच्या बांधकामाच्या खर्चाचा हिशोब सरकारने दिलेला नाही. मंत्रिमंडळातून गोविंद गावडे यांची हकालपट्टी झाली असली तरी अकादमीच्या अडचणी संपलेल्या नाहीत. आमची लढाई सुरूच राहणार आहे.

कलाक्षेत्रातील व्यक्तीलाच अध्यक्षपद दिल्यास कलाकारांच्या गरजा समजून घेतल्या जातील, फायली लवकर पुढे जातील आणि अकादमी योग्य हातात जाईल, असे संदेश प्रभुदेसाई यांनी सांगितले. कलाकारांचे प्रश्न, प्रयोगासाठी जागेचा अभाव यावरही संघटनेने चिंता व्यक्त केली.

रवींद्र भवनचीही स्थिती चिंताजनक असून, मडगाव व काणकोण येथील भवन डागडुजीसाठी बंद असल्याने कलाकारांसमोर अडचणी निर्माण होत आहेत. पुढील काळात कलाराखण मांडकडून या विषयावर लढा अधिक तीव्र केला जाईल, असे संघटनेचे पदाधिकारी म्हणाले.