Connect with us

गोवा खबर

फोंतेन्हास परिसरात पर्यटकांचा उपद्रव रोखण्यासाठी महापौरांची कारवाई

Published

on

Spread the love

गोवा खबर : फोंतेन्हास आणि सां टोमे भागात वाढलेल्या पर्यटकांच्या अनुशासनहीन वर्तनामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी पणजी महानगरपालिकेने या भागात निरीक्षक आणि कर्मचारी नेमण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महापौर रोहित मोन्सेरात यांनी सर्वसाधारण सभेत दिली.

नगरसेविका लॉरेन डायस यांनी पर्यटकांमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल आवाज उठवला. पर्यटक वारंवार सांगूनही फोटोशूट, व्हिडीओ शूट करत असतात, वाहनं चुकीची चालवतात आणि अस्वच्छता करतात. या प्रकारांवर आळा घालण्यासाठी महापौरांनी निरीक्षक तैनात करून कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. अस्वच्छता केल्यास दंडही आकारण्यात येणार आहे.

या बैठकीत एल दोरादो ही धोकादायक इमारत पाडण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच सांतिनेझ स्मशानभूमीवर सीसीटीव्ही आणि टोकन सिस्टीम बसवण्याची मागणीही नगरसेवकांनी मांडली.