Connect with us

गोवा खबर

हवाई वाहतूक महासंचालनालयाने एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेस यांच्या परिचालनाचा घेतला आढावा 

Published

on

Spread the love

गोवा खबर : हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या विमान कंपन्यांच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांची उच्च स्तरीय बैठक घेतली. या दोन्ही कंपन्या सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रात दररोज 1,000 हून अधिक विमानोड्डाणांचे परिचालन करत आहेत.

या  कंपन्यांच्या परिचालनात्मक सशक्ततेचा आढावा घेण्यासाठी तसेच सुरक्षितता आणि प्रवासी सेवाविषयक नियमांच्या सातत्यपूर्ण पालनाची सुनिश्चिती करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीतील चर्चेत खालील महत्त्वाच्या मुद्द्यांवर उहापोह करण्यात आला:

  1. देखभाल-संबंधित विलंब: एअर इंडियातर्फे नुकत्याच नोंदवण्यात आलेल्या देखभाल-संबंधित समस्यांविषयी डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली. अशा प्रकारच्या समस्यांमुळे प्रवाशांना होणारा विलंब टाळण्यासाठी या विमान कंपनीने अभियांत्रिकी, परिचालन, भूमीवरील हाताळणी युनिट्स यांच्यातील अंतर्गत समन्वय मजबूत करावा आणि पुरेशा सुट्या भागांची उपलब्धता सुनिश्चित करावी तसेच नियमांचे काटेकोरपणे पालन करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
  2. हवाई क्षेत्रावरील निर्बंध: अलीकडच्या काळात काही हवाई क्षेत्रांवर विशेषतः इराणी हवाई क्षेत्रावर घातलेल्या निर्बंधाच्या परिणामांचा आढावा घेण्यात आला.
  3. प्रवाशांना दिली जाणारी माहिती आणि सुविधा: विमान प्रवासाला होणारा विलंब किंवा उड्डाण रद्द होण्यासारख्या घटनांची प्रवाशांना आगाऊ स्वरुपात माहिती दिली जाण्यासंदर्भात संबंधित नागरी हवाई उड्डाणविषयक आवश्यकता विभाग 3 मालिका एम भाग IV आणि V अंतर्गत अनिवार्य जबाबदाऱ्यांची परिचालन कंपनीला आठवण करून देण्यात आली. परिणामकारक प्रवासी सुविधा आणि सर्व उपलब्ध मार्गांच्या माध्यमातून माहितीचे योग्य वेळी प्रसारण यावर अधिक भर देण्यात आला.
  4. B787 ताफ्यातील विमानांचे निरीक्षण: एअर इंडियाच्या बोईंग 787 ताफ्यातील विमानांच्या अलीकडेच केलेल्या निरीक्षणातून कोणत्याही प्रकारच्या सुरक्षितताविषयक मोठ्या चिंताजनक बाबी उघड झाल्या नव्हत्या. विमान आणि संबंधित देखरेख यंत्रणा यांनी विद्यमान सुरक्षा मानकांचे पालन केल्याचे दिसून आले.
  5. मेसर्स एअर इंडियाच्या बी 787-8/9 ताफ्याच्या “वर्धित सुरक्षा तपासणीची स्थिती (17 जून 2025 रोजी, दुपारी 3 वाजता): आदेश परिच्छेद 1 अंतर्गत अनिवार्य केलेली “वर्धित सुरक्षा तपासणी” संपूर्ण एअर इंडिया बी787-8/9 ताफ्यासाठी लागू आहे, ज्यामध्ये 33 विमाने आहेत. यापैकी 4 विमाने सध्या विविध एमआरओ सुविधास्थानी मोठ्या तपासणीतून जात आहेत. 17 जून 2025 रोजी दुपारी 3 वाजता, एकूण 24 विमानांनी आवश्यक तपासणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. आज आणखी 2 विमाने पूर्ण करण्याचे नियोजन आहे, तर उद्या आणखी 1 विमान पूर्ण करण्याचे नियोजन आहे. उर्वरित 6 विमानांमध्ये समाविष्ट असलेली 2 विमाने सध्या दिल्ली येथे एओजी म्हणजेच जमिनीवर आहेत.
  6. कामकाज समन्वय: नियामकाने कामकाज आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाच्या विभागांना वेळेवर अपडेट मिळतील याची खात्री करण्यासाठी अधिक पद्धतशीर आणि रिअल-टाइम दोष निर्देश यंत्रणा लागू करण्याची शिफारस केली आहे. यामुळे एकूण निर्णय घेण्याची क्षमता वाढेल.
  7. वाइड-बॉडी फ्लाइट ऑपरेशनल डेटा: डीजीसीएने एअर इंडियाच्या वाइड-बॉडी ऑपरेशन्ससाठी अलीकडील ऑपरेशनल डेटाचा देखील आढावा घेतला, ज्यामध्ये विशेषत्वाने बोईंग 787 ताफ्यावर विशेष लक्ष केंद्रित केले गेले.
Date Total number of flights operated Total number of flights Cancelled Total number of B787 flights operated Total number of B787 flights Cancelled
12-Jun 90 6 50 5
13-Jun 80 22 41 11
14-Jun 86 12 47 12
15-Jun 76 16 41 14
16-Jun 75 11 39 11
17-Jun* 55 16 30 13
* Till 1800 hrs

डीजीसीएने प्रवाशांची सुरक्षा, कामकाजातील विश्वासार्हता आणि नियामक अनुपालनाप्रती आपली वचनबद्धता पुन्हा व्यक्त करत  सर्व नियोजित ऑपरेटर्सच्या कामगिरीवरची देखरेख  जारीच राहील असे म्हटले आहे.