Connect with us

गोवा खबर

खासदार, मंत्री व आमदार यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट

Published

on

Spread the love

गोवा खबर : रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला गोव्यातील भाजपचे खासदार सदानंद शेट तानावडे, पुरातत्व विभागाचे मंत्री सुभाष फळदेसाई, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, वास्कोचे आमदार दाजी उपाख्य कृष्णा साळकर आणि मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली.

सनातनच्या आश्रमात चालणारे राष्ट्र-धर्म, तसेच आध्यात्मिक संशोधन या कार्याची माहिती त्यांना या वेळी देण्यात आली. याप्रसंगी सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त वीरेंद्र मराठे आणि संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांच्याशीही त्यांनी राष्ट्र, धर्म, संस्कृती यांविषयी चर्चा केली. याप्रसंगी गोमंतक मंदिर महासंघाचे जयेश थळी, तसेच हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे हेही उपस्थित होते.

खासदार, मंत्री आणि आमदार यांनी सनातन संस्थेच्या आश्रमातून चालणाऱ्या कार्याविषयी माहिती जिज्ञासेने जाणून घेतली. फळदेसाई म्हणाले, ‘‘आश्रमात पुष्कळ सकारात्मक स्पंदने जाणवत आहे. सनातन संस्था शिकवत असलेली स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया खूप चांगली आहे.” खासदार तानावडे यांनी आश्रमातील व्यवस्थापन आणि् स्वच्छता उत्तम असल्याचे म्हटले. आमदार साळकर आणि आमदार आमोणकर यांनी ‘आमच्या मतदारसंघांत सनातनच्या राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी आम्ही कायम सेवा देत राहू’, असे आश्‍वासन दिले.