Connect with us

गोवा खबर

वारसा धोरणास मंजुरी, वनहक्क दावे निकाली काढणार

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्य मंत्रिमंडळाने गोवा राज्य वारसा धोरणास मंजुरी दिली आहे. तसेच चिंबल येथे युनिटी मॉलसाठी वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. वननिवासींच्या दाव्यांसाठी नव्या सर्वेअर्सची नियुक्ती केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

या धोरणात खासगी व सरकारी 100 पेक्षा अधिक ऐतिहासिक इमारतींचा समावेश असून, त्यांचे जतन करून पर्यटनासाठी उपयोग करण्याचा हेतू आहे.

तसेच, टॅक्सीप्रश्नी लवकरच सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. पाणी प्रकल्प, मोबाईल टॉवर, वैद्यकीय पदभरती आदी निर्णयही मंत्रिमंडळात घेण्यात आले.