Connect with us

गोवा खबर

१४ जून रोजी वैरागी दादांचे गोव्यात आध्यात्मिक चर्चासत्र

Published

on

Spread the love

गोवा खबर: आदिगुरू विश्वस्त संस्था, पुणे, आदिगुरू परिवार गोवा व श्री महालसा नारायणी मंदिर समितीच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारी वेर्णा येथे आध्यात्मिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार १४ जून २०२५ रोजी संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत हा सत्संग कार्यक्रम श्री महालसा नारायणी देवालय सभागृह, जुने म्हार्दोळ, वेर्णा येथे होणार असून त्यात सिध्दयोगी श्री अभिषेक वैरागी (दादा) यांचे भाविकांना मार्गदर्शन लाभेल.

योग, भक्ती, तत्वज्ञान, आध्यात्मिक शास्त्रावर व्याख्यान, देवयज्ञ भजन, नामसंकिर्तन, योगतपःशक्ती प्रक्षेपण (शक्तीपात) असे कार्यक्रमाचे स्वरूप असेल. या सत्संगासाठी प्रवेश विनामूल्य आहे. श्री दादा हे, परमात्मा श्री स्वामी समर्थांचे मानसपुत्र व सायुज्यमुक्ती प्राप्त महान सिध्दयोगी असून त्यांनी आदिगुरू सांप्रदायाची स्थापना केली आहे.

दादांचा मंत्रयोग, कुंडलिनी योग व हठयोगावर गाढा अभ्यास असून त्यांना अनेक अंशावतारी सद्गुरूंचे मार्गदर्शन प्राप्त झाले आहे. अशा महान सद्गुरूंच्या सत्सगांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

गोवाभरातून अनेक भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यासाठी संपर्क साधला असून प्रथम येणा-यास, प्रथम संधी अशा तत्वावर आसन व्यवस्था असेल. त्यामुळे उपस्थित राहू इच्छिणा-यांनी शेफाली नार्वेकर ९५११८ १५३६८, स्वाती केरकर ९८२३३ ६४१४० किंवा हेरंब पारकर ९८६०० ४१९५१ या क्रमांकावर संपर्क साधून अधिक माहिती मिळवावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.