Connect with us

गोवा खबर

राज्यपालांकडून गोव्यातील लोकांना ईद-उल-जुहाच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांनी गोव्यातील लोकांना ईद-उल-जुहा (बकरी-ईद) निमित्त हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, मी गोव्यातील लोकांना विशेषत: मुस्लिम बांधवांना ईद-उल-जुहाच्या (बकरी ईदच्या) हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो.  ईद-उल-जुहा हा सण भारतात आणि संपूर्ण जगात पारंपारिक भावनेने आणि आनंदाने साजरा केला जातो. या सणाला त्यागाचा सण असेही म्हणतात आणि हा सर्वात महत्त्वाचा इस्लामिक सण आहे. हा सण क्षमा आणि दानाचे प्रतिक आहे आणि समाजाच्या सदस्यांमध्ये सलोखा आणि बंधुत्वाची भावना वाढीस लावतो.

या प्रसंगी, मी सर्व धर्माच्या लोकांना शांतता, स्नेहभाव, मैत्री आणि परस्पर सामंजस्याने एकत्र राहण्याचे आवाहन करतो ज्यामुळे आपल्याला अधिक आनंद आणि समृद्धी साध्य करणे शक्य होईल. ईद-उल-जुहा हा सण लोकांमध्ये अधिक शांतता आणि मैत्रीची भावना वाढीस लावो असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.

मुख्यमंत्र्यांकडून ईद-उल-जुहाच्या शुभेच्छा

मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी गोव्यातील लोकांना आणि विशेषत: मुस्लिम बांधवांना ईद-उल-जुहा निमित्त हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

आपल्या संदेशात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणतात, ईद-उल-जुहा सणामुळे नेहमीच लोकांमध्ये दया, करुणा आणि प्रेम, एकता, शांतता  आणि सामाजिक सलोखा या मूल्यांची भावना वाढीस लागते.

या आनंदाच्या प्रसंगी या राज्याच्या वाढीसाठी आणि विकासासाठी योगदान देऊन आपल्या समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण एकत्र येऊया असे मुख्यमंत्री आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.