Connect with us

गोवा खबर

खाजन शेतीसाठी सरकारचा नवा आराखडा; जुनी पद्धत नव्या जोमात

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्यातील खाजन शेती, जी कधी काळी समृद्ध होती, ती पुन्हा बहरावी यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील सुमारे १३ हजार हेक्टर खाजन जमिनींचे पुनरुज्जीवन करण्यात येणार असून, त्यासाठी बंधारे दुरुस्त करणे, मत्स्यपालन वाढवणे आणि पर्यावरणपूरक शेतीस प्रोत्साहन देणे अशा उपाययोजना राबवण्यात येणार आहेत.

‘ज्योती’ आणि ‘करगुट’ यांसारख्या पारंपरिक भाताच्या जाती पुन्हा उपयोगात आणल्या जातील. तसेच, स्थानिक शेतकरी आणि समुदाय यांचा यात सक्रीय सहभाग असेल.