Connect with us

गोवा खबर

राज्यात पाच लाख झाडे लावण्याचा मंत्री राणेंचा संकल्प

Published

on

Spread the love

गोवा खबर : पर्यावरण दिनानिमित्त सोनसोडो येथे आयोजित कार्यक्रमात आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी पुढील तीन महिन्यांत गोव्यात पाच लाख झाडे लावण्याची घोषणा केली.

त्यांनी सांगितले की, ज्या इमारती २५० चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या आहेत, त्यांच्यासाठी ‘टेरेस गार्डन’ किंवा ‘व्हर्टिकल गार्डन’ बंधनकारक केले जाणार आहे.

मंत्री राणे यांनी मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत स्थानिक महिलांना या अभियानात सामील होण्याचे आवाहन केले. परिसरातील नागरिक आणि महिलांनी देखील या वृक्षारोपणात उत्स्फूर्त सहभाग घेतला.