Connect with us

गोवा खबर

डॉ. अनीता तिळवे व सुबोध मोने यांची मराठी राजभाषा निर्धार समितीत राज्यप्रमुखपदी निवड

Published

on

Spread the love

गोवा खबर : मराठी राजभाषा निर्धार समितीच्या केंद्रीय मार्गदर्शक व कार्यकारी मंडळांच्या संयुक्त बैठकीत मातृशक्ती राज्यप्रमुख म्हणून प्रा. डॉ. अनीता तिळवे (फोंडा) यांची, तर युवाशक्ती राज्यप्रमुख म्हणून सुबोध मोने (नानोडा – डिचोली) यांची निवड जाहीर करण्यात आली.

सुबोध मोने

डॉ. तिळवे या सामाजिक क्षेत्रात विविध सेवाभावी प्रकल्पांमध्ये कार्यरत असून, त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. दुसरीकडे, सुबोध मोने हे एक सशक्त सोशल ॲक्टिव्हिस्ट असून, संगणक शिक्षण प्रसाराच्या माध्यमातून युवकांमध्ये जनजागृती घडवत आहेत.

मराठी राजभाषा निर्धार समितीने आगामी ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर २०२५ या कालावधीत गोवा राज्यात विविध ठिकाणी युवाशक्ती व मातृशक्ती संमेलने आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने संघटनात्मक यंत्रणा बळकट करण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती करण्यात आली असल्याचे समितीचे निमंत्रक प्राचार्य सुभाष भास्कर वेलिंगकर यांनी सांगितले.