Connect with us

गोवा खबर

अनुपालन आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी गोवा पर्यटनाकडून ऑनलाइन ट्रॅव्हल अ‍ॅग्रीगेटर्सची नोंदणी अनिवार्य

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा सरकारच्या पर्यटन खात्याने राज्यात कार्यरत असलेल्या सर्व ऑनलाइन ट्रॅव्हल अ‍ॅग्रीगेटर्सना (ओटीए) गोवा पर्यटन व्यापार नोंदणी कायदा, १९८२ आणि नियम १९८५ नुसार नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. अशा सर्व संस्थांनी अधिकृत परिपत्रक जारी झाल्यापासून, १५ कामकाजी दिवसांच्या आत त्यांची नोंदणी पूर्ण करावी. या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

गोवा पर्यटन व्यापार नोंदणी कायदा, १९८२ आणि नियम १९८५ च्या तरतुदींनुसार पर्यटन खात्याकडून आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र (एन.ओ.सी.), परवाना किंवा परवानगी न घेता अनेक ओटीए ऑनलाइन बुकिंग स्वीकारण्याचे काम करत आहेत/चालवत आहेत, असे निरीक्षणास आल्यानंतर हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. सर्व संबंधितांना या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.