गोवा खबर : मिनेझिस ब्रागांझा संस्थेने २४ मे रोजी प्रेयल फार्म हाऊस, खांडेपार, फोंडा येथे “बहुभाषिक महिला साहित्यिक मेळावा” आयोजित केला आहे. राज्यात साहित्य आणि कला संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेच्यावतीने दरवर्षी कार्यशाळा, परिसंवाद, स्पर्धा यासारखे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.
समाज सेविका सुलक्षणा सावंत यांच्याहस्ते इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. साहित्य क्षेत्रात योगदान दिलेल्या महिला या मेळाव्यात भाग घेतील. मेळाव्यात कविता लेखन, साहित्य लेखनावर चर्चा आणि मार्गदर्शन सत्रे होतील.
समारोप समारोप समारंभ संध्या ४.३० वाजता होणार आहे. गोव्यातील महिला लेखिकानी या बहुभाषिक महिला साहित्यिक मेळाव्यात सहभागी होण्याची विनंती संस्थेने केली आहे.