Connect with us

गोवा खबर

राज्यपालांच्या नवीन खुशल कल्याण यात्रेस प्रारंभ

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी आज “खुशाल कल्याण यात्रा” कार्यक्रमांतर्गत दक्षिण गोव्यातील पाच पवित्र स्थळांना भेट दिली. राज्यपाल लवकरच गोव्यातील सर्व तालुक्यांमधील विविध मंदिरे, चर्च, दर्गे आणि गुरुद्वारांना भेट देणार आहेत.

२०२१ मध्ये गोव्याचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारल्यापासून पिल्लई यांनी राज्यातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी गोवा ग्राम संपूर्ण यात्रा, सैमीक दायज यात्रा, द्वीप परिचय यात्रा आणि गोवा गिर्यारोहण यात्रा अशा अनेक यात्रा काढल्या आहेत.

गोव्यात अलिकडेच घडलेल्या एका दुर्दैवी घटनेच्या संदर्भात आणि देशात निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, राज्यपालांनी विविध पवित्र स्थळांना भेटी देऊन एक नवीन “खुशाल कल्याण यात्रा” सुरू करण्याची घोषणा केली आहे. या यात्रेदरम्यान, राज्यपाल या प्रार्थनास्थळांवर प्रार्थना करीत आहेत आणि गोव्यातील आणि राष्ट्राच्या शांती, आनंद आणि कल्याणासाठी दैवी आशीर्वाद घेत आहेत.

श्री अनंत पद्मनाभ मंदिरात आगमन झाल्यावर सावईवेरे देवस्थान समितीचे अध्यक्ष राहुल शेट वेरेकर व आदींनी राज्यपालांचे पुष्प अर्पण करून स्वागत केले. यावेळी माजी अध्यक्ष सुदिन शेट वेरेकर, अनंत सेवा प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष सुहास शेट वेरेकर, माजी अध्यक्ष  सदानंद शेट वेरेकर, स्थानिक सरपंच शोभा पेरणी व इतर उपस्थित होते. देवस्थानच्यावतीने राज्यपालांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. राज्यपालांनी देवस्थान समितीला ५०,००० रुपयांचा धनादेश ज्रदान केला.

नंतर राज्यपालांनी म्हार्दोळ येथील श्री महालसा नारायणी मंदिराला भेट दिली. कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी राज्यपालांचे स्वागत केले. नंतर श्री महालसा नारायणी मंदिराचे अध्यक्ष प्रेमानंद कामत यांनीही राज्यपालांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सचिव सनीव कामत, खजिनदार सचिन पै, दर्शन पै वर्णेकर, डॉ. नागेश पै काकोडे आणि इतर उपस्थित होते.

राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई आणि गोव्याच्या प्रथम महिला रिता श्रीधरन पिल्लई यांनी श्री महालसा नारायणी मंदिरात प्रार्थना केली.

नंतर, राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई आणि गोव्याच्या प्रथम महिला रीता श्रीधरन पिल्लई यांनीही नागेशी मंदिरात प्रार्थना केली. देवस्थान समितीच्या वतीने राज्यपालांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

नागेशी मंदिरात आगमन झाल्यावर, राज्यपालांचे स्वागत अध्यक्ष संजय शेणवी प्रियोळकर आणि इतरांनी केले. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हेही यावेळी उपस्थित होते.

त्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या भागात राज्यपालांनी मडगाव येथील राशोल सेमिनरीला भेट दिली जिथे स्वामी विवेकानंदांनी तीन दिवस घालविले होते. राज्यपालांचे आगमन झाल्यावर फादर टोनेटो रॉड्रीगीस व इतरांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे यावेळी उपस्थित होते. राज्यपालांनी राशोल सेमिनरीसाठी १ लाख रूपयांचा धनादेश फादर डोनेटो रॉड्रीगीस यांच्याकडे सुपूर्द केला. नंतर राज्यपालांनी सेमिनरीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

नंतर राज्यपालांनी फातोर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळकरीण देवस्थान, श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण देवस्थान आणि श्री सप्तकोटेश्वर मंदिरास भेट दिली.