गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद पी. सावंत यांनी आज डिचोली येथे सरकारी कार्यालय संकुल इमारतीच्या बांधकामाची पायाभरणी केली. या प्रकल्पाचा अंदाजे खर्च ५७.३३ कोटी रुपये आहे.पायाभरणी समारंभास डिचोलीचे आमदार, आणि गोवा इन्फोटेक कॉर्पोरेशनचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत पी. शेट्ये, मयेचे आमदार श्री. प्रेमेंद्र व्ही.शेट, माजी आमदार व सभापती श्री. राजेश पाटणेकर, सभापती, डिचोलीचे नगराध्यक्ष श्री. विजयकुमार नाटेकर, , उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी यशस्विनी बी, डिचोलीचे उप जिल्हाधिकारी, श्री नेहाल तळावणेकर, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष श्री शंकर चोडणकर आणि जीएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक श्री हरीश अडकोणकर या समारंभास उपस्थित होते.सुरवातीस श्रीमती यशस्विनी बी, आयएएस यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
समारंभात बोलताना, मुख्यमंत्र्यांनी पुढील २५ वर्षांत गोवा एक प्रगतीशील राज्य बनविण्याचे राज्य सरकारचे स्वप्न असल्याचे सांगितले. प्रशासनात सुधारणा करण्यासाठी ते लोकांच्या गरजांना अधिक प्रतिसाद देणारे बनविण्यासाठी प्रभावी कामकाज आणि सुव्यवस्थित विकास सुनिश्चित करणे हे राज्य सरकारचे ध्येय आहे असे ते म्हणाले.
विकसित भारताचे इच्छित ध्येय साध्य करण्यासाठी कोणतीही कसर सोडली जाणार नाही यासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणा त्या दिशेने काम करू लागली आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
ऑनलाइन ई-सेवांवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की गोवा ऑनलाइन ई-सेवा पोर्टल नागरिकांना कोणत्याही सरकारी कार्यालयात न जाता कधीही विविध सरकारी सेवा एकाच खिडकीत उपलब्ध करून देण्यात आले आहे. गोवा राज्यात २११ सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यांनी सरकारच्या अशा ई-सेवाचा फायदा घेण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना आमदार डॉ चंद्रकांत शेट्ये यांनी डिचोली तालुक्यातील हा एकमेव प्रकल्प असून डिचोली तालुक्यातील लोकांच्या सर्व मागण्या पूर्ण होतील असे सांगितले.
श्री शेट्ये यांनी प्रकल्पातील विविध सुविधांची माहिती दिली. सदर इमारतीच्या चौथ्या मजल्यावर कला भवन आहे. आमदार श्री प्रेमेंद्र शेठ यांचेही यावेळी भाषण झाले. उपजिल्हाधिकारी श्री नेहाल तळवणेकर यांनी आभार मानले.