गोवा खबर : वाहतूक संचालनालयाने मार्च २०२५ मध्ये झालेल्या अपघातांची आणि जारी केलेल्या चलनांचा मासिक अहवाल तयार केला आहे. अहवालानुसार, १९८ रस्ते अपघात झाले, त्यापैकी २० प्राणघातक अपघात (उत्तर गोवा – १२ आणि दक्षिण गोवा – ८), १८ गंभीर अपघात (उत्तर गोवा – ८ आणि दक्षिण गोवा – १०), ४४ किरकोळ अपघात (उत्तर गोवा – १५ आणि दक्षिण गोवा – २९) आणि ११६ दुखापत न झालेले अपघात (उत्तर गोवा – ६० आणि दक्षिण गोवा – ५६) होते.
रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या २० (उत्तर गोवा – १२ आणि दक्षिण गोवा – ८), २४ लोक गंभीर जखमी (उत्तर गोवा – १२ आणि दक्षिण गोवा – १२), तर ६५ जणांना किरकोळ दुखापत झाली (उत्तर गोवा – २१ आणि दक्षिण गोवा – ४४).
मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये १२ चालक (उत्तर गोवा ५ आणि दक्षिण गोवा – ७), ३ मागे बसलेले (उत्तर गोवा – ३ आणि दक्षिण गोवा – ०) आणि ५ पादचारी (उत्तर गोवा – ४, दक्षिण गोवा- १) यांचा समावेश आहे.