Connect with us

गोवा खबर

हिंदूंचा नरसंहार चालू असलेल्या पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा ! : हिंदु जनजागृती समिती

Published

on

Spread the love

गोवा खबर: वक्फ कायद्याच्या आड हिंदूंचा नरसंहार चालू असलेल्या पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने राष्ट्रपतींकडे केली आहे. या मागणीचे एक निवेदन उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी स्नेहा गित्ते (आय.ए.एस्.) यांच्यामार्फत राष्ट्रपतींना पाठवण्यात आले आहे. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये सौ. राजश्री गडेकर, कु. संगीता नाईक, श्री. दिलीप शेट्ये आणि श्री. राज बोरकर आदींचा समावेश होता.

निवेदानात म्हटले आहे की, पश्चिम बंगालमध्ये दंगलखोर जमावाने २०० हून अधिक घरे आणि दुकाने लुटली व जाळली आहेत. शेकडो लोक जखमी झालेले आहेत, तर ३ हिंदूंची हत्या करण्यात आलेली आहे. हा हिंसाचार म्हणजे मुर्शिदाबादला पूर्णपणे आणि पश्चिम बंगालला टप्पाटप्प्याने हिंदू-विहिन बनवण्याचे कट्टरवाद्यांचे षड्यंत्र आहे. पश्चिम बंगालमध्ये हिंदूंच्या धार्मिक उत्सवांवरही हल्ले होत आहेत. या सर्व घटनांमध्ये ममता बॅनर्जी सरकारची निष्क्रीयता उघड झाली आहे. अराजकता माजलेल्या पश्चिम बंगालमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि तेथील हिंसाचाराची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (एन्.आय.ए.) किंवा केंद्रीय अन्वेषण विभाग (सी.बी.आय.) यांच्या वतीने अन्वेषण करावे.