Connect with us

गोवा खबर

हनुमान जयंतीनिमित्त आज सामूहिक गदापूजन उत्साहात

Published

on

Spread the love

गोवा खबर : आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने हिंदू जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि भाविक यांच्या सहभागाने देशभरात ५०० ठिकाणी सामूहिक ‘गदापूजन’ करण्यात आले.  चिंबल, साखळी, मोर्ले (सत्तरी), हळदोणा आदी ठिकाणी सामूहिक गदापूजनाचा कार्यक्रम घेण्यात आले. यात विशेषत: युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

या कार्यक्रमांची सुरुवात शंखनादाने झाली. त्यानंतर सामूहिक प्रार्थना, ‘गदापूजन’ विधी, हनुमानाची आरती, मारुति स्तोत्रपठण केल्यानंतर ‘श्री हनुमते नम:’ हा सामूहिक नामजप करण्यात आला. या वेळी ‘रामराज्याच्या स्थापनेसाठी मारुतीरायांचे गुण कसे आत्मसात करावेत’ याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले. समितीच्या वतीने देशभरात गेली ३ वर्ष सामूहिक ‘गदापूजन’ कार्यक्रम यशस्वीपणे घेण्यात येत आहेत आणि यावर्षीही भाविक यांचा उत्तम सहभाग यात दिसून आला.