Connect with us

गोवा खबर

टाईम : गोव्यातील पर्यटन माहिती व्यवस्थापनात वाढ

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्यातील पर्यटन उद्योग हे एक गतिमान आणि सतत विकसित होत असलेले क्षेत्र आहे, जे दरवर्षी लाखो पर्यटकांना आकर्षित करते. अखंडपणे कार्य आणि माहिती-आधारित निर्णय घेणे सुनिश्चित करण्यासाठी, पर्यटन खात्याने पर्यटक माहिती व्यवस्थापन एंटरप्राइझ (टाईम) सादर केला आहे, जो प्रदात्यांकडून पर्यटक माहितीचे संकलन सुलभ करण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.

या उपक्रमांतर्गत, प्रत्येक हॉटेल व्यावसायिक आणि निवासी युनिटने मासिक आधारावर आकडेवारीचा प्रोफॉर्मा (फॉर्म-XI) डेटा सादर करणे आवश्यक आहे. ही माहिती पुरवण्याची अंतिम मुदत प्रत्येक महिन्याची ५ तारीख आहे, जेणेकरून पर्यटन खात्याला पर्यटकांच्या मुक्कामाबाबत वेळेवर आणि अचूक आकडेवारी प्राप्त होणे, सुनिश्चित होईल. हा डेटा अधिकृत गोवा ऑनलाइन पोर्टलद्वारे ऑनलाइन जमा करणे आवश्यक आहे, ज्यामुळे सर्व भागधारकांसाठी ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि कार्यक्षम होईल.

या नियमावलीचे पालन हे, थेट निवास प्रदात्यांसाठी नोंदणी प्रमाणपत्रांच्या नूतनीकरणाशी निगडित आहे. मागील वर्षासाठी आवश्यक आकडेवारी अपलोड करण्यात अयशस्वी ठरलेले हॉटेलधारक नूतनीकरणासाठी पात्र ठरणार नाहीत. यामुळे वेळेवर माहिती पाठविण्याचे महत्त्व वाढेल. या आदेशाची अंमलबजावणी करून, पर्यटन खात्याचे पर्यटन-संबंधित डेटाचे एकूण व्यवस्थापन सुधारण्याचे उद्दिष्ट आहे. धोरणे आणि पायाभूत सुविधा विकास हा अचूक आणि अद्ययावत माहितीद्वारे समर्थित असल्याचे यावरून सुनिश्चित होईल.

पर्यटन उद्योगातील अनेकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असले तरी त्याची अंमलबजावणी अधिक कडक व गांभीर्याने होणे आवश्यक असल्याचे काही भागधारकांचे मत आहे. एनव्ही इकोफार्म म्हणून कार्यरत असलेल्या *एनव्ही इको ॲग्रो टुरिझम प्रा.लि.च्या मालक सौ. स्मिता पाटील* यांनी या प्रणालीच्या अंमलबजावणीबद्दल चिंता व्यक्त करताना सांगितले, कि “सरकारचा हा एक स्तुत्य उपक्रम आहे. परंतु दुर्दैवाने, प्रत्येक भागधारकांनी आवश्यक माहिती जमा केली आहे, याची खात्री करण्यासाठी त्याच्या योग्य अंमलबजावणीचा अभाव आहे. पर्यटन खाते सर्व नोंदणीकृत हॉटेलसाठी डेटा सबमिशन अनिवार्य करण्यास कठोर पावले उचलेल आणि नोंदणीकृत नसलेल्या निवासस्थानांना योग्य प्रणाली अंतर्गत आणले जाईल, याची खात्री करेल अशी मला आशा आहे. अनेक गेस्ट हाऊस नोंदणीविना कार्यरत आहेत, ज्यामुळे पर्यटन डेटामध्ये तफावत आहे. पर्यटन माहितीचे योग्य संकलन हे खात्याला मुख्य क्षेत्रे ओळखण्यास आणि पर्यटन नियोजन सुधारण्यास सक्षम बनवेल.”

अचूक पर्यटन डेटा गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला आकार देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. विश्वसनीय आकडेवारी सरकारला चांगली धोरणे तयार करण्यात, संसाधनांचे कार्यक्षमतेने वाटप करण्यात आणि अभ्यागतांचे अनुभव वाढविण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त, ते शाश्वत पर्यटनासाठी अधिक संरचित दृष्टिकोनास वाट मोकळी करते तसेच पुनरुत्पादित पर्यटनाच्या राज्याच्या व्यापक दृष्टिकोनाशी संरेखित करते. अभ्यागतांच्या ट्रेंडचा मागोवा घेऊन, उद्योग हा समतोल आणि शाश्वत पद्धतीने भरभराटीला येईल याची खात्री करून जबाबदार पर्यटनाला चालना देण्यासाठी अधिकारी माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतात.

‘टाईम’चा परिचय हा गोव्यातील अधिक संघटित आणि पारदर्शक पर्यटन परिसंस्थेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आता डिजिटल रिपोर्टिंग अनिवार्य झाल्यामुळे, या उपक्रमाद्वारे प्रशासन मजबूत होते, आदरातिथ्य व्यवसायांना फायदा होतो आणि अधिक कार्यक्षम, माहिती-चालित पर्यटन क्षेत्रामध्ये योगदान देणे सुलभ होते. अविरत कार्य सुनिश्चित करण्यासाठी आणि गोव्याच्या पर्यटन उद्योगाच्या सामूहिक वाढीस समर्थन देण्यासाठी, माहिती जमा करणे हे आवश्यकतांचे पालन करण्यास्तव हॉटेल व्यावसायिकांना प्रोत्साहित केले जाते.