Connect with us

गोवा खबर

आर्थिक विकासाला चालना दिल्याबद्दल पंतप्रधानांनी GeM चे केले कौतुक

Published

on

Spread the love

गोवा खबर : उपजीविकेच्या साधनात वाढ, संपूर्ण भारतात तळागाळात रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सरकारी ई-मार्केटप्लेस (GeM) पोर्टलची प्रशंसा केली. 

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी X या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान म्हणाले, “उपजीविकेच्या साधनात वाढ सुनिश्चित करणे, संपूर्ण भारतात तळागाळात रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना देणे ही प्रशंसनीय कामगिरी.”