Connect with us

गोवा खबर

जागतिक डिजिटल पेमेंट क्षेत्रात आरबीआयची महत्त्वाची भूमिका : राष्ट्रपती मुर्मू

Published

on

Spread the love

गोवा खबर : देशाची मध्यवर्ती  बँक म्हणून भारतीय रिझर्व्ह बँक भारताच्या अविश्वसनीय विकासाच्या गाथेच्या केंद्रस्थानी आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने स्वातंत्र्यापूर्वीच्या काळातील सर्वदूर पसरलेल्या दारिद्र्यापासून ते आता जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्थांपैकी एक असलेला देश बनण्याच्या काळापर्यंतचा देशाचा संपूर्ण प्रवासाची साक्षीदार आहे असे,  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.

भारतीय रिझर्व्ह बँकेचा 90 व्या वर्धापनदिनाचा सांगता सोहळा आज (1 एप्रिल) मुंबईत मुर्मू यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी राष्ट्रपतींनी उपस्थितांना संबोधित केले.

भारतीय रिझर्व्ह बँकेने वेगाने वाढणाऱ्या आपल्या राष्ट्राच्या बदलत्या गरजांनुरूप बदल आत्मसात केले आहेत. आर बी आय ने 1990 च्या दशकातील आर्थिक उदारीकरणापासून ते कोविड 19 महामारीपर्यंत देशावर आलेल्या सर्व प्रमुख आव्हानांना जलद प्रतिसाद देत लवचिकता आणि अनुकूलतेचे दर्शन घडवले आहे. अतिशय वेगाने होत असलेल्या जागतिकीकरणाच्या या विश्वात प्रतिकूल अशा वैश्विक कलांमध्ये देखील भारताची वित्तीय यंत्रणा लवचिक राहू शकते हे आर बी आय ने सिद्ध केले आहे.

भारताला अधिक समृद्ध भविष्याकडे तसेच जागतिक नेतृत्व होण्यासाठी मोलाची कामगिरी बजावेल,  असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चलनविषयक स्थिरता आणि आर्थिक स्थैर्याची रक्षक या  नात्याने एक मजबूत बँकिंग प्रणाली सुनिश्चित करणे, आर्थिक नवोन्मेषाला चालना देणे आणि आपल्या आर्थिक परिसंस्थेवरील विश्वासाचे रक्षण करणाच्या या प्रवासात आरबीआय एक निर्णायक भूमिका बजावेल, असे राष्ट्रपती म्हणाल्या.