Connect with us

गोवा खबर

दक्षिण कोरियेच्या बाजारपेठेत स्थान मजबूत करण्यासाठी गोवा पर्यटनाचा सेऊलमध्ये रोड शो

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा पर्यटन २८ मार्च २०२५ रोजी सेऊल येथे होणाऱ्या रोड शोद्वारे दक्षिण कोरियाच्या प्रवासी बाजारपेठेवर चांगला ठसा उमटविण्यास सज्ज आहे. समुद्रकिनारे, दोलायमान संस्कृती आणि वारसा आकर्षण, यांच्या मिश्रणामुळे जागतिक स्तरावर ओळखले जाणारे गोवा राज्य, दक्षिण कोरियेच्या पर्यटकांना वैविध्यपूर्ण प्रवास अनुभव देईल.

हा रोड शो दक्षिण कोरियातील आघाडीचे टूर ऑपरेटर, ट्रॅव्हल एजंट, एअरलाइन प्रतिनिधी आणि हॉस्पिटॅलिटी व्यावसायिकांना एकत्र आणेल. धोरणात्मक सहकार्यांना चालना देण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे उद्दिष्ट, व्यावसायिक संबंध वाढवणे आणि अद्वितीय असा सांस्कृतिक, साहसी, अंतर्गत प्रदेश आणि वेलनेसचा अनुभव शोधणाऱ्या दक्षिण कोरियेच्या प्रवाशांसाठी, गोव्याला पसंतीचे ठिकाण म्हणून प्रोत्साहन देणे, हे आहे.

या उपक्रमामुळे आंतरराष्ट्रीय ओळख वाढवण्याची, उदयोन्मुख प्रवासी बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्याची आणि दीर्घकालीन भागीदारींना प्रोत्साहन देण्याची गोवा पर्यटनाची बांधिलकी वाढते. या कार्यक्रमात उपस्थितांना गोव्याच्या विकसित पर्यटन क्षेत्राची ओळख करून दिली जाईल. लक्झरी रिसॉर्ट्स, निसर्गमय साहसी पर्यटन, आध्यात्मिक पर्यटन आणि वेलनेस रिट्रीट यासारखा प्रीमियम प्रवासी अनुभव सादर केला जाईल.

आगामी रोड शोबद्दल बोलताना, पर्यटन संचालक केदार नाईक म्हणाले, गोव्याला प्रत्येक प्रवाशासाठी काहीतरी खास सेवा देणारे गंतव्यस्थान बनवणे, तसेच शाश्वत आणि पुनरुत्पादक पर्यटन पद्धतींना प्राधान्य देणे, हे आमचे ध्येय आहे. दक्षिण कोरियाच्या प्रवासी बाजारपेठेत प्रचंड क्षमता आहे. या रोड शोद्वारे, आम्ही दक्षिण कोरियाच्या प्रवासी व्यावसायिकांशी अर्थपूर्ण संबंध निर्माण करण्यास उत्सुक आहोत. आम्हाला विश्वास आहे, की या सहभागामुळे गोव्याची ओळख आणखी वाढेल आणि जबाबदार पर्यटन वाढीस प्रोत्साहन मिळेल.

या कार्यक्रमात माहितीपूर्ण सादरीकरणे, परस्परसंवादी सत्रे आणि नेटवर्किंगच्या संधी असतील, ज्यामुळे दक्षिण कोरियाच्या प्रवासी व्यावसायिकांना गोव्याच्या पर्यटन सेवांबद्दल ज्ञान मिळू शकेल. समृद्ध असा सांस्कृतिक वारसा, साहसी पर्यटन, निरोगी अनुभव आणि जबाबदार प्रवास पद्धती यांचे सुसंवादी मिश्रण असणारे, गोवा हे वर्षभरात कधीही भेट देण्यासारखे गंतव्यस्थान आहे, हे प्रदर्शित करण्यावर विशेष भर दिला जाईल.