Connect with us

गोवा खबर

निकृष्ट दर्जाची आले लसूण पेस्ट विकल्याबद्दल दंड

Published

on

Spread the love

गोवा खबर:अन्न आणि औषध प्रशासन संचालनालयाने उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी निकृष्ट दर्जाची लसूण पेस्ट विकल्याबद्दल अन्न व्यवसाय चालकांना दंड ठोठावल्याची माहिती दिली आहे.

लसूण पेस्ट विक्री केल्याबद्दल मेसर्स शैलेंद्र ऋषी राज इंडस्ट्रीज इंडिया (आय) प्रायव्हेट लिमिटेड डी. क्रमांक १-६/१, शक्ती हाऊस, कंकनाडी बायपास रस्ता, मेंगलोर, महानगर पालिका भाग, दक्षिण कन्नड, कर्नाटक आणि श्री गंगाधर पुजारी (घाऊक विक्रेता) में. गंगा एन्टरप्रायझेस घर क्रमांक ५१/२२-ए चर्चवाडा, खोर्ली आणि श्री प्रविण कुमार, (किरकोळ विक्रेता)  में बालाजी सुपर मार्केट, दुकान क्रमांक  बी/२४, वॉर्ड क्रमांक ११, बेती रेईश मागोस बार्देश यांना अनुज्ञेय मर्यादेपेक्षा कमी असलेल्या अ‍ॅसिटिक अ‍ॅसिडसह कमी दर्जाची आले लसूण पेस्टची विक्री केल्याबद्दल प्रत्येकी ५०,०००/- रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी सुजाता शेटगावकर यांनी न्यायाधिकरण अधिकाऱ्यांकडे खटला दाखल केला आहे.