- विद्यमान आणि नवीन जिओ सिम वापरकर्त्यांसाठी विशेष ऑफर
- TV/मोबाइलवर 4K मध्ये 90 दिवसांचे मोफत जिओहॉटस्टार
- 50 दिवसांसाठी मोफत जिओफायबर/एअरफायबर ट्रायल कनेक्शन
गोवा खबर : क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी! जिओ आपल्या विद्यमान आणि नवीन ग्राहकांसाठी एक खास ऑफर घेऊन आला आहे. 299 रुपये किंवा त्याहून अधिकचा प्लान असलेले नवीन जिओ सिम कनेक्शन घेतल्यास किंवा किमान 299 रुपयांचे रिचार्ज केल्यास, जिओ ग्राहक जिओहॉटस्टारवर IPL क्रिकेट सीझन मोफत पाहू शकतात.
या अनलिमिटेड क्रिकेट ऑफरमध्ये ग्राहकांना TV किंवा मोबाइलवर 90 दिवसांचे मोफत जिओहॉटस्टार सबस्क्रिप्शन मिळेल आणि तेही 4K क्वालिटीमध्ये. म्हणजेच, ग्राहक 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या IPL क्रिकेट सीझनचा आनंद मोफत घेऊ शकतात. जिओहॉटस्टार पॅक 22 मार्च 2025 पासून पुढील 90 दिवसांसाठी वैध असेल.
यासोबतच, जिओ घरी जिओफायबर किंवा जिओएअरफायबरचे मोफत ट्रायल कनेक्शनही देणार आहे. अल्ट्रा फास्ट इंटरनेटसह 50 दिवसांचे मोफत ट्रायल कनेक्शन मिळेल. ग्राहकांना 4K मध्ये क्रिकेट पाहण्याचा उत्तम अनुभव आणि शानदार होम एंटरटेनमेंट मिळणार आहे. जिओफायबर किंवा जिओएअरफायबरच्या मोफत ट्रायल कनेक्शनसोबत 800+ TV चॅनेल्स, 11+ OTT अॅप्स आणि अनलिमिटेड WIFI मिळेल.
ही ऑफर 17 मार्च ते 31 मार्च 2025 दरम्यान उपलब्ध असेल. ऑफरचा लाभ घेण्यासाठी विद्यमान जिओ सिम वापरकर्त्यांना किमान 299 रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. नवीन जिओ सिम ग्राहकांनाही 299 रुपये किंवा त्याहून अधिक प्लानसह नवीन सिम घ्यावे लागेल. जे ग्राहक 17 मार्चपूर्वीच रिचार्ज करून आहेत, ते 100 रुपयांचा अॅड ऑन पॅक घेऊनही ऑफरचा लाभ घेऊ शकतात.