Connect with us

गोवा खबर

दयानंद बांदोडकरांच्या स्मृतीस आदरांजली

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांना त्यांच्या जयंती दिनी आदरांजली वाहण्यात आली.  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजी येतील जुन्या सचिवालयाकडील आणि त्यानंतर पर्वरी येथील नवीन सचिवालय प्रकल्पातील दयानंद बांदोडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

वीजमंत्री रामकृष्ण उर्फ सुदिन ढवळीकर आणि पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनी पर्वरी येथील  नवीन सचिवालय प्रकल्पातील दयानंद बांदोडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

मुख्य सचिव डॉ. कांदावेलू, आयजीपी ओमवीर सिंग बिष्णोई, उत्तर गोवा जिल्हाधिकारी डॉ. स्नेहा गीते, उध्योजक यतीन काकोडकर, समीर काकोडकर आणि इतर मान्यवरांनी  बांदोडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.