गोवा खबर : पर्यावरण आणि हवामान बदल खात्याने २०२५ मध्ये विशिष्ट दिवशी रात्री १० ते १२ या वेळेत लाऊडस्पीकर किंवा सार्वजनिक भाषण प्रणालीचा वापर करण्यास परवानगी देणारा आदेश जारी केला आहे.
ज्या सांस्कृतिक, धार्मिक उत्सवाच्या प्रसंगी आणि तारखांना परवानगी देण्यात आली आहे त्यामध्ये ४ मार्च कार्निव्हलचा शेवटचा दिवस, २० एप्रिल २०२५ रोजी ईस्टरचा अगोदरचा दिवस, २८ आणि ३१ ऑगस्ट २०२५ रोजी गणेश चतुर्थी मूर्ती विसर्जनाचा दुसरा आणि पाचवा दिवस, ६ सप्टेंबर २०२५ रोजी अनंत चतुर्दशी, १ ऑक्टोबर २०२५ रोजी नवरात्रचा शेवटचा दिवस, १९ ऑक्टोबर २०२५ रोजी दिवाळीचा अगोदरचा दिवस, २१ आणि २२ नोव्हेंबर २०२५ रोजी इफ्फी, २४ डिसेंबर २०२५ रोजी नाताळचा अगोदरचा दिवस, २५ डिसेंबर २०२५ रोजी नाताळ आणि २८ ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान नवीन वर्षाची अगोदरचा दिवस यांचा समावेश आहे.
संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका किंवा गोवा राज्यातील एखाद्या व्यक्तीने केलेल्या विशिष्ट अर्जाच्या प्रतिसादात परवानगी दिली जाईल.
ध्वनी प्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियम, २००० मधील तरतुदींचे काटेकोरपणे पालन केले जाईल. संबंधित ‘अधिकारी‘ परवानगी असलेल्या उत्सवाच्या वेळी आणि इतर प्रसंगी देखील ध्वनी पातळीचे निरीक्षण करील आणि त्याचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.