गोवा खबर : अखिल गोमंतकीय दैवज्ञ ब्राम्हण युवा संघाची सातवी दैवज्ञ क्रिकेट चषक स्पर्धा 1 व 2 मार्च रोजी एसएजी मैदान, फातोर्डा येथे पार पडली.
या क्रिकेट स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात मेडिकल प्रेक्टिशनर अॅण्ड निवृत्त लेफ्टनंट कर्नल विनोद साळकर, संगीतकार मुकेश घाटवळ उपस्थित होते.
यावेळी सिमरन संतोष हळदणकर यांना दक्षिण आशिया कराटे चॅम्पियनशीप 2024 मध्ये कास्यपदक मिळाल्याबद्दल गौरव करण्यात आला. या स्पर्धेत संपूर्ण गोव्यातून एकूण 14 संघांसह 2 महिला संघांनीही सहभाग घेतला होता.
अखिल गोमंतकीय दैवज्ञ ब्राम्हण असोसिएशनच्या अध्यक्ष सीमा वेर्णेकर यांनी स्वागत केले. तसेच असोसिएशनने वर्षभरात राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
साळकर यांनी अखिल गोमंतकीय दैवज्ञ ब्राम्हण संस्थेने अशा प्रकारचे उपक्रम राबवल्याबद्दल कौतुक केले.

विजेत्या संघासह उपविजेत्या संघाला तसेच इतर व्यक्तींनामान्यवरांतर्फे चषक प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमास 300 हून अधिक लोक उपस्थित होते.
विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे : पुरूष विजेता संघ – दामबाब दख, उपविजेता – डायनॅमिक क्रिकेटर्स, मालिकावीर – आयुष वेर्लेकर, सर्वोत्कृष्ट फलंदाज – अमृत वेर्लेकर, सर्वोत्कृष्ट गोलंदाज – दीप्तेश हळदणकर, अंतिम फेरीचा सामनावीर – यश कासवणकर, सर्वोत्तम झेल – मिथील कारेकर, जास्तीत जास्त षटकार – आयुष वेर्लेकर, सर्वोत्कृष्ट आगामी खेळाडू – यश कासवणकर, महिला विजेता संघ – दक्षिण वॉरियर्स, महिला उपविजेता संघ – बार्देश रिगल्स, महिला सामनावीर – स्नेहल वाळके.
वैभवी बांदोडकर व विशाल वेर्णकर यांनी सूत्रसंचालन केले. अखिल गोमंतकीय दैवज्ञ ब्राम्हण यांचे साहिल लोटलीकर यांनी आभार मानले.