गोवा खबर : केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्यावतीने स्वच्छता आणि आरोग्य धोक्यात असलेल्या काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांकडून प्रीमॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविले आहेत. सरकारी, मान्यताप्राप्त खाजगी शाळा आणि मान्यताप्राप्त संस्थांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलांना ही शिष्यवृत्ती देण्यात येते.
पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी १० महिन्यांसाठी २२५ रुपये आणि वार्षिक ७५० रुपये एडहॉक ग्रांट तर तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी १० महिन्यांसाठी दरमहा ७०० रुपये आणि १००० रुपये एडहॉक ग्रांट दिले जाते. अर्ज नमुना आणि अधिक माहितीसाठी समाज कल्याण संचालनालय, १८ जून मार्ग पणजी येथे येथे संपर्क साधावा. आपले अर्ज संस्था प्रमुखांमार्फत २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सादर केले पाहिजे.