Connect with us

गोवा खबर

‘कचऱ्याचा पुनर्वापर आणि हवामान बदल’वरील परिषदेचे उद्‌घाटन

Published

on

Spread the love

गोवा खबर : केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री, भूपेंद्र यादव यांनी आज ‘कचऱ्याचा पुनर्वापर आणि हवामान बदल  2025’ या विषयावर भारतीय पुनर्वापर आणि पर्यावरण उद्योग संघटना,रिआई (REIAI) यांच्याद्वारे आयोजित केलेल्या एक दिवसीय परिषदेचे आज उद्‌घाटन केले.

उद्‌घाटन सत्राला संबोधित करताना केंद्रीय मंत्री म्हणाले, “प्लास्टिक, इलेक्ट्रॉनिक आणि घातक कचऱ्याचे प्रमाण भारतात वेगाने वाढत असून, त्यामुळे भारतात दरवर्षी सुमारे 62 दशलक्ष टन कचरा निर्माण होतो. घ्या, बनवा आणि विल्हेवाट लावा, यासाठी असलेले पूर्वीचे  आर्थिक मॉडेल यापुढे उपयोगाचे नाही. जमिनीवरील कचऱ्याचा वाढता भार, नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास आणि अनियंत्रित कचऱ्याची विल्हेवाट न झाल्याने  होणारी पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची आवश्यकता आहे. वर्तुळाकार अर्थव्यवस्था हा केवळ पर्याय नाही; तर  ती आवश्यकता आहे.  हे साहित्य आपण कसे तयार करतो, वापरतो आणि व्यवस्थापित करतो यात त्यामुळे मूलभूत बदल घडून येतो.” चांगले कार्य करणारी वर्तुळाकार अर्थव्यवस्था केवळ नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करत नाही तर औद्योगिक नवकल्पना, आर्थिक स्पर्धात्मकता आणि रोजगार निर्मितीलाही चालना देते, असे ते म्हणाले.