Connect with us

गोवा खबर

तुये पेट्रोल पंपजवळ चारचाकी-दुचाकी अपघात : युवक जागीच ठार

Published

on

Spread the love

गोवा खबर : तुये पेट्रोल पंप जवळ आर्टिका जीए 11,टी 16 72 आणि दुचाकी जीये थ्री, एके 61 25 याच्यात समोरासमोर अपघात होऊन दुचाकी चालक राज पेडणेकर 25 वर्षीय युवक जागीच ठार होण्याची घटना घडली.

सविस्तर माहिती नुसार आर्टिका जीए 11,टी 16 72 हे वाहन त्या ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंप वर पेट्रोल घालण्यासाठी टर्न मारत होते. पेट्रोल पंप बंद असल्यामुळे त्यांनी टर्न घेताना विरुद्ध दिशेने तुये मार्गे पेडणे दुचाकी वाहन जीए झिरो थ्री एके 61 25 हे वाहन राज पेडणेकर चालवत होते. समोरासमोर आणि दोन्ही वाहनाला काहीच कुणाचा अंदाज न आल्यामुळे जबरदस्त धक्का बसल्यामुळे दुचाकी स्वार राज पेडणेकर हा जागीच ठार होण्याची घटना घडली.

राज पेडणेकर पंचवीस वर्षीय युवक मूळ बिचोली भागातील परंतु तो तुये इथला भाचा असून शिवोली येथे तो वास्तव्य करून राहत होता. सुरुवातीला काही काळ त्याने गॅरेज चालवण्याचं काम केलं होतं. त्याच्या सोबत त्यांचा एक भाऊ आणि आई आहे. भाऊ बारावी मध्ये शिक्षण घेत आहे. आणि तो परीक्षा देण्यासाठी गेला होता.

मान्द्रे पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. वाहन चालक सौरव गुडेकर नेमळे वेंगुर्ला या वाहन चालकाला पोलिसांनी अटक केली.