-
पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलद्वारे अप्रयुक्त जमिनी उपलब्ध करण्याचे नियोजन
गोवा खबर : गोवा पुनर्वसन मंडळ आणि गोवा गृहनिर्माण मंडळ यांनी नरेडको महाराष्ट्रच्या रिअल इस्टेट डेव्हलपर्सना गोवा राज्यातील निवासी, व्यावसायिक, मिश्र वापर (मिक्स्ड-यूज), पुनर्विकास आणि बिझनेस पार्क क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधींचा शोध घेण्याचे आवाहन केले आहे.
नरेडको महाराष्ट्रच्या वार्षिक सभेत गोवा पुनर्वसन मंडळ आणि गोवा गृहनिर्माण बोर्डच्या वरिष्ठ प्रतिनिधींनी “गोव्यातील रिअल इस्टेट संधींचा शोध” या विषयावर सादरीकरण केले. ही सभा आज पणजी येथील हॉटेल ताज सिडाडे डी गोवा होरायझनमध्ये आयोजित करण्यात आली होती. या वेळी नरेडको महाराष्ट्र चॅप्टरच्या १० व्या वर्षपूर्तीनिमित्त महत्त्वपूर्ण यशस्वी टप्प्याचे स्मरण करण्यात आले.
_“गोवा हे फक्त पर्यटनस्थळ राहिलेले नाही, तर व्यवसाय विस्तारासाठी आणि रिअल इस्टेट प्रकल्पांसाठीही मोठी संधी उपलब्ध आहे. समुद्रकिनारी तसेच गोव्यातील आतल्या भागात नवीन निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प उभारू इच्छिणाऱ्या विकसकांसाठी तसेच सेकंड होम्स, लग्झरी व्हिला, रेंटल होम्स किंवा हॉटेल प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या जागतिक गुंतवणूकदारांसाठी गोवा एक मोठे आकर्षण ठरले आहे,”_ असे गोवा पुनर्वसन मंडळाचे सचिव अलेक्झो दा कोस्टा* यांनी “गोव्यातील संधी” या विषयावर बोलताना सांगितले.
राज्यातील अप्रयुक्त जमीन तुकड्यांच्या पुनर्विकासासाठी आणि PPP मॉडेलच्या माध्यमातून त्या जमिनींचे व्यापारीकरण करण्याची घोषणा करताना * दा कोस्टा* म्हणाले, _“सार्वजनिक क्षेत्र आपल्या वापरातील जमिनींच्या पुनर्विकासासोबत अप्रयुक्त जमिनींच्या व्यापारीकरणासाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारी मॉडेलचा अवलंब करत आहे. वास्को, सडा वास्को, बैना, झुआरी नगर, कोलवले यांसारख्या भागात मोठ्या प्रमाणात अप्रयुक्त जमिनी आहेत, ज्यामुळे मोठ्या गुंतवणुकीसाठी संधी उपलब्ध आहे. या सर्व प्रक्रियांसाठीसाठी लवकरच निविदा जाहीर केल्या जातील,”_ असेही त्यांनी सांगितले.
*गोवा गृहनिर्माण मंडळाचे हाउसिंग इंजिनिअर सदाशिव गावकर* यांनी “गोव्यातील रिअल इस्टेट क्षेत्रातील संधी” यावर बोलताना आघाडीच्या विकासक आणि गुंतवणूकदारांना राज्यातील महत्त्वाच्या जमिनींच्या धोरणात्मक विकासात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले. _“व्यावसायिक, रिमोट वर्कर्स आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या वाढत्या मागणीमुळे गोव्यातील रिअल इस्टेट क्षेत्र सध्या वेगाने विकसित होत आहे. राज्यात विविध प्रकारच्या निवास व्यवस्थांची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि मिश्र-वापर प्रकल्पांसाठी गुंतवणुकीची आवश्यकता आहे,”_ असे ते म्हणाले.
नरेडको महाराष्ट्रच्या वार्षिक सभेत सहभागी होणे ही राज्यातील रिअल इस्टेट क्षेत्र समजून घेण्याची मोठी संधी असल्याचे नमूद करताना *नरेडको महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रशांत शर्मा* म्हणाले, _“गोवा हे आता केवळ आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ नसून जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करणारे रिअल इस्टेट हब बनत आहे. गोव्यातील रिअल इस्टेट क्षेत्राचा विकास करण्यासाठी राज्याने विकसकांना आमंत्रित करणे हा एक स्वागतार्ह उपक्रम आहे.”_
*नरेडकोचे व्हाईस चेअरमन राजन बांदेलकर* म्हणाले, _“केंद्र सरकारच्या पायाभूत सुविधा वाढीच्या धोरणामुळे लहान राज्यांतही मोठे बदल घडत आहेत. गोवा हे राज्य पर्यटनाला केंद्रस्थानी ठेवून इतर व्यवसायांना बळकटी देत आहे. नरेडको महाराष्ट्र गोव्याच्या रिअल इस्टेट क्षेत्राला वेग देण्यासाठी सहकार्य करेल.”_