गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज सकाळी मार्सिले येथील माझारग्युस युद्ध समाधी स्थळाला भेट दिली. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली.
दोन्ही नेत्यांनी पुष्पांजली अर्पण करून शहीद वीरांच्या बलिदानाच्या सन्मानार्थ आदरांजली वाहिली. युरोपमधील शांततेसाठी लढणाऱ्या भारतीय सैनिकांचे शौर्य आणि बलिदानाचा इतिहास माझरी युद्ध समाधी स्थळी जतन करण्यात आला आहे. त्यांची शौर्य गाथा आजही लोकांना प्रेरणा देत आहे. हे युद्ध समाधी स्थळ भारत-फ्रान्स संबंध जोपासणाऱ्या दोन्ही देशांच्या नागरिकांमधील दृढ संबंधांचे प्रतीक आहे.