गोवा खबर : राजभवनची वार्षिक सत्यनारायण महापूजा १३ रोजी सकाळी ९.०० वाजता होणार आहे. त्यानंतर आरती व महाप्रसाद होईल.
येणाऱ्या भाविकांना राजभवनाच्या हेलिपॅडवर त्यांची वाहने पार्क करता येतील आणि राज भवनच्या प्रवेशद्वारावर सरकारी फोटो ओळखपत्र दाखविणे गरजेचे आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव लोकांनी कोणतेही हॅंडबॅग सोबत आणू नये, असे कळवण्यात आले आहे.