गोवा खबर : बेळगाव युनायटेड एफएने मंगळवारी गोव्यातील ड्रीम स्पोर्ट्स चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या दिवशी स्पोर्टिंग क्लब दि गोवावर ६-० असा विजय मिळवला. शीतम मीतेई दोन गोल केले. त्याला सामनावीर जाहीर करण्यात आले. तर शाहीर अलीने देखील दोन गोल केले आणि दोन सहाय्य केले.
रोनाल्डो सिंगने १८ व्या मिनिटाला गोलची सुरुवात केल्यानंतर शाहीर अलीने ४७ व्या मिनिटाला दुसरा गोल केला. त्यानंतर ५५ व्या मिनिटाला विद्यानंद मेतेईने गोल केले तर ७० व्या आणि ८२व्या मिनिटाला शीतम मीतेईने दोन गोल केले. शाहिरने खेळाच्या इंज्युरी टाईममध्ये (९०+३) सहावा गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
दिवसाचा दुसरा सामना अत्यंत चुरशीचा ठरला. सेसा फुटबॉल अकादमीने गार्डियन एंजल्स स्पोर्ट्स क्लबचा १–० असा पराभव केला. लिओ सोरामने ५२ व्या मिनिटाला पेनल्टी स्पॉटवर केलेला गोल निर्णायक ठरला.
बुधवारचे सामने फिल्ड्स ऑफ ड्रीम्स ग्राउंड, गिरी, म्हापसा येथे होतील.
सकाळी ९:०० वाजता धेंपो एससी विरुद्ध बेळगाव युनायटेड एफए,
दुपारी १२:०० वाजता एफसी गोवा विरुद्ध सेसा फुटबॉल असोसिएशन.