Connect with us

गोवा खबर

एकलव्य शिक्षण योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Published

on

Spread the love

गोवा खबर : आदिवासी कल्याण संचालनालयाने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी गोवा राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये नियमित वर्गात उपस्थित असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवित आहेत.

आदिवासी कल्याण संचालनालय इयत्ता दहावी  विषय (गणित, विज्ञान आणि इंग्रजी), अकरावी विज्ञान (गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र) बारावी वाणिज्य,  (लेखा आणि गणित) अकरावी (कला- इंग्रजी आणि अर्थशास्त्र) मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळण्यासाठी “एकलव्य शिक्षण योजना” ही योजना राबवत आहे.

 कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.५.०० लाखापेक्षा जास्त नसावे. एकात्मिक कोचिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घेत असलेले विद्यार्थी जे खाजगी शाळा म्हणून स्वतंत्रपणे संचालित केले जातात ते योजनेअंतर्गत अर्ज करण्यास पात्र नाहीत. योजनेअंतर्गत आवश्यक असलेली कागदपत्रे अर्जात नमूद केलेली आहेत. कोचिंग इन्स्टिट्यूटना भरलेल्या फीपैकी ७५% गोवा राज्यातील कोचिंग संस्थांमध्ये शिक्षण संचालनालयाने मान्यता दिलेल्या किंवा गोवा कोचिंग क्लासेस रेग्युलेशन ॲक्ट, २००१ अंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना परतफेड केली जाईल. कोचिंग संस्थेच्या सक्षम अधिकाऱ्याद्वारे अशा फीची पावती योग्यरित्या प्रमाणित केली जाईल.

अर्ज नमुना आदिवासी कल्याण संचालनालयाचे मुख्य कार्यालय, ५ वा मजला, श्रमशक्ती भवन, पाटो पणजी आणि उप संचालक, आदिवासी कल्याण, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, मडगाव येथे उपलब्ध आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२५  अशी आहे.