गोवा खबर : आझाद मैदान, पणजी येथील हुतात्मा स्मारकावर ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात आपले प्राण अर्पण केले त्यांच्या स्मरणार्थ ३० जानेवारी रोजी पुष्पांजली अर्पण केली जाईल. सकाळी १०.४० वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल.
राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई , मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर व इतर मान्यवर हुतात्मा स्मारकास पुष्पहार अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहतील. मोठ्या संख्येने नागरिकांनी व स्वातंत्र्य सैनिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे अशी विनंती करण्यात आली आहे.