Connect with us

गोवा खबर

निमसुलाइड औषधावर बंदी

Published

on

Spread the love

गोवा खबर : अन्न आणि औषध प्रशासन संचालनालयाने औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० नुसार प्राण्यांच्या वापरासाठी निमसुलाइड औषधाचे उत्पादन, विक्री किंवा वितरण करण्यावर बंदी घातली आहे अशी माहिती दिली आहे.

 मंडळाच्या शिफारशीनुसार निमसुलाइड असलेल्या औषधांच्या वापरामुळे प्राण्यांना धोका होण्याची शक्यता असल्याने ही बंदी घातली आहे आणि या औषधांसाठी सुरक्षित पर्याय उपलब्ध आहेत.

त्यासाठी राज्यभरातील सर्व औषध विक्रेते, घाऊक विक्रेते, उत्पादक आणि पशुवैद्यकीय आस्थापनानी निमसुलाइडवरील बंदीची नोंद घ्यावी आणि त्याचा वापर आणि विक्री बंद करावी. विक्रेत्यांकडे या औषधाचा स्टॉक असल्यास तो उत्पादकांना परत करावा असे अन्न आणि औषध प्रशासन संचालनालयाने कळविले आहे.