Connect with us

गोवा खबर

गोवा स्टार्टअप यात्रा बूटकॅम्प २०२४ चा नाविन्यपूर्ण स्टार्टअप कल्पनांच्या सन्मानाने समारोप

Published

on

Spread the love
गोवा खबर : राज्यातील इच्छुक विद्यार्थी उद्योजकांना पाठिंबा आणि मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या गोवा स्टार्टअप यात्रा बूटकॅम्प २०२४ या दोन दिवसीय कार्यक्रमाचा समारोप झाला. गोवा सरकारच्या माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स विभागांतर्गत स्टार्टअप आणि आयटी प्रमोशन सेलने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात, सहभागींना मौल्यवान संसाधने आणि मार्गदर्शन प्रदान करण्यात आले, जेणेकरुन त्यांना त्यांचे स्टार्टअप सुरू करण्याच्या आणि स्केलिंगच्या कामामध्ये योग्य पर्याय निवडून, दीर्घकालीन यश मिळविण्यास पुढे मदत होईल. 
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी मिळालेल्या मार्गदर्शनानंतर, सहभागींनी त्यांच्या परिष्कृत स्टार्टअप कल्पना मांडल्या, ज्यात त्यांनी मार्गदर्शकांनी दिलेला मौल्यवान अभिप्राय प्रतिबिंबित केला.  कार्यक्रमाच्या अखेरीस एक पिचिंग स्पर्धा होती, जिथे विद्यार्थ्यांनी त्यांच्या औद्योगिक कल्पना परीक्षकांच्या पॅनेलसमोर मांडल्या. या दोन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात अनुभवी मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले, ज्यात इंडिया ब्लॉकचेन अलायन्सचे संस्थापक  राज कपूर, ग्लोबल अलायन्स फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड इनोव्हेशनचे अध्यक्ष प्रज्योत माईणकर, सोफ्यूल्डचे संस्थापक आणि सीईओ राहुल बहादुर,  हेडस्टार्ट नेटवर्क फाऊंडेशनचे गोवा चॅप्टर लीड मांगिरिश सालेलकर, उमंग ग्रुपचे सीईओ आणि सहसंस्थापक मार्क मेंडीस, ईडीसी बोर्ड सदस्या रझिया सारदिन्हा आणि पाद्रे कॉसेसाव कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगचे सहाय्यक प्राध्यापक यांचा समावेश होता. या सर्व वक्त्यांनी संपूर्ण कार्यक्रमात मौल्यवान अंतर्दृष्टी आणि समर्थन देऊन विद्यार्थ्यांसोबत जवळून काम केले.
परीक्षकांच्या पॅनेलमध्ये हेडस्टार्ट नेटवर्क फाऊंडेशनच्या धोरणात्मक भागीदारी आणि ऑपरेशन्स प्रमुख  वानिया दंगवाल, व्यवस्थापन सल्लागार शीतल चौहान आणि अटल इनक्युबेशन सेंटर – जीआयएम मधील स्टार्टअप इकोसिस्टम एनेबलर आणि इंक्यूबेशन व्यवस्थापक श्री. अभिषेक सिंग यांचा समावेश होता. सहभागींना त्यांच्या पीच आणि उद्योजकीय दृष्टिकोन सुधारण्यात मदत करण्यासाठी परीक्षकांनी मौल्यवान अंतर्दृष्टी आणि मार्गदर्शन प्रदान केले.
यावेळी मांडलेल्या २५ नाविन्यपूर्ण  स्टार्टअप्स कल्पनांमधून सहा जणांची अंतिम पिचिंग फेरीसाठी निवड करण्यात आली. आग्नेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि डिझाइन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेला फ्लेक्सिबस हा बस ट्रॅकिंग सोल्यूशन, गोवा स्टार्टअप यात्रा बूटकॅम्प २०२४ चा विजेता ठरला. तर डिजिटल युगातील शहरी विकास, स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चरसाठी डिजिटल मॅपिंग प्लॅटफॉर्म तयार केलेल्या, डॉन बॉस्को कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना उपविजेते पद मिळाले. रेमॅट फिलामेंट, कॅफरमॅक्स, वोलोक आणि नीडी पॉज हे अन्य चार स्टार्टअप्स, अंतिम फेरीत पोहोचले.  आपल्या पीच दरम्यान, विद्यार्थी उद्योजकांनी गोव्याच्या उद्योजकीय क्षेत्रामधील सर्जनशीलता आणि संभाव्यता दर्शवून, सरकारी पाठबळ, निधी, मार्गदर्शन, उत्पादन जागा आणि विपणन संघ तयार करण्यासाठी समर्थन मागितले.
फ्लेक्सिबसचे संस्थापक, आयसाक फर्नांडिस यांनी बोलताना सांगितले केले, की “मी बूटकॅम्पमध्ये सहभागी होऊन खूप खुश आहे आणि मला मार्गदर्शकांकडून अमूल्य असे मार्गदर्शन मिळाले आहे.” त्याचप्रमाणे, उपविजेता संघ, अर्बन ग्रोथ इन द डिजिटल एजने व्यक्त होताना सांगितले, की “आम्हाला आमच्या स्टार्टअपची कल्पना मार्गदर्शकांसमोर मांडण्याची आणि आम्हाला आमच्या संकल्पनांचा नवीन दृष्टीकोनातून विचार करण्याची संधी दिल्याबद्दल, आम्ही आभारी आहोत.”
स्टार्टअप आणि आयटी प्रमोशन सेलचे सीईओ डी एस प्रशांत यांनी आपल्या समारोपीय भाषणात दोन दिवसीय कार्यक्रमात झालेल्या प्रगतीवर प्रकाश टाकला. त्यांनी ही प्रगती टिकवून ठेवण्याच्या महत्त्वावर भर दिला व सांगितले, कल्पनेकडून अंमलबजावणीकडे जाणे, येथेच खरे आव्हान सुरू होते.  गेल्या दोन दिवसांनी तुम्हाला तुमच्या कल्पना पुढे नेण्यासाठी साधने आणि ज्ञान प्रदान केले आहे. उद्योजक, मार्गदर्शक आणि उद्योगातील पुढाऱ्यांशी संपर्कात राहणे महत्त्वाचे आहे, कारण ही नाती तुमच्या भविष्यातील प्रगतीसाठी आवश्यक ठरू शकतात. त्यांनी स्टार्टअप्सना समर्थन देण्याच्या गोवा सरकारच्या निरंतर वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि स्टार्टअप व आयटी प्रमोशन सेलद्वारे उपलब्ध संसाधनांवर प्रकाश टाकला. ज्यामध्ये सीड कॅपिटल ग्रांट, मार्गदर्शन कार्यक्रम, फ्लिप द क्लासरूम उपक्रम यांचा समावेश आहे. हे उपक्रम संस्थापकांची आव्हाने समजून घेण्यावर आणि स्टार्टअपची भरभराट होण्यास मदत करण्यासाठी, डिझाइन केलेली संसाधने आणि इतर गोष्टी प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करतात.  आम्ही तुम्हाला या संधींचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी प्रोत्साहित करतो.  तुमच्या उद्योजकीय प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला साथ देणे, हे आमचे ध्येय आहे, असे त्यांनी सांगितले.
या दोन दिवसांत विद्यार्थ्यांना मौल्यवान ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्ये मिळाल्याने बूटकॅम्पचे यश स्पष्ट झाले. हे कार्यक्रम इच्छुक उद्योजकांना व्यावहारिक अंतर्दृष्टी, मार्गदर्शन आणि नेटवर्किंग संधींसह सुसज्ज करतात. तसेच त्यांना आव्हानांवर मात करण्यासाठी आणि गोव्याच्या स्टार्टअप समुदायाच्या यशात योगदान देण्यास मदत करतात.