Connect with us

गोवा खबर

बिट्स पिलानी संघाने राज्यस्तरीय फेरीत मिळवले विजेतेपद

Published

on

Spread the love

भारतीय रिझर्व बँकेच्या 90व्या वर्धापनदिन सोहळ्याचा भाग म्हणून प्रश्नमंजुषेचे आयोजन

गोवा खबर :  भारतीय रिझर्व बँकेच्या (RBI) 90व्या वर्धापनदिन सोहळ्याचा भाग म्हणून सुरु करण्यात आलेल्या RBI90Quiz या देशव्यापी सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नमंजूषा स्पर्धेच्या गोवा राज्यस्तरीय फेरीत बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (BITS) पिलानी, गोवा कॅम्पसच्या संघाने विजेतेपद मिळवले. 

10 ऑक्टोबर रोजी पणजी येथील पणजी परिषद केंद्रात आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत गोव्याच्या विविध शैक्षणिक संस्थांमधील 44 संघांनी सहभाग घेतला. प्रत्येक संघात दोन विद्यार्थी होते.

बिट्स पिलानी संघातील ध्रुव चांडक आणि केतव शाह यांनी विजेतेपद मिळवले, तर गोवा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फर्मगुडी आणि रायेश्वर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, शिरोडा या संघांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले. पहिल्या तीन संघांना अनुक्रमे 2 लाख रुपये, 1.5 लाख रुपये आणि 1 लाख रुपये असे पारितोषिक देण्यात आले.

विजयी संघ आता विभागीय फेरीत स्पर्धेसाठी सज्ज होईल. ही स्पर्धा 21 नोव्हेंबर 2024 ते 4 डिसेंबर दरम्यान होईल. राष्ट्रीय अंतिम स्पर्धा डिसेंबर 2024 मध्ये मुंबई येथे होणार आहे. विभागीय फेरीतील पहिले, दुसरे आणि तिसरे स्थान मिळवणाऱ्या संघांना अनुक्रमे 5 लाख रुपये, 4 लाख रुपये आणि 3 लाख रुपये असे बक्षीस देण्यात येईल. तर राष्ट्रीय अंतिम स्पर्धेतील पहिल्या तीन संघांना अनुक्रमे 10 लाख रुपये, 8 लाख रुपये आणि 6 लाख रुपये बक्षीस दिले जाईल.

भारतीय रिझर्व बँकेच्या 90व्या वर्धापनदिनानिमित्त, RBIने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. RBI90Quiz ही विविध संघांदरम्यान खेळवली जाणारी स्पर्धा असून ती विविध टप्प्यांत आयोजित केली जात आहे. या स्पर्धेचा ऑनलाइन टप्पा 19 ते 21 सप्टेंबर दरम्यान पार पडला. ऑनलाइन टप्प्यातील कामगिरीच्या आधारे महाविद्यालयीन संघांची राज्यस्तरीय फेरीसाठी निवड करण्यात आली होती.