Connect with us

गोवा खबर

राज्यपालांकडून गोव्यातील लोकांना दसऱ्याच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love

गोवा खबर: राज्यपाल श्री पीएस श्रीधरन पिल्लई यांनी गोव्यातील लोकांना दसऱ्याच्या शुभप्रसंगी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.        आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, दसरा हा आपल्या देशात मोठ्या उत्साहाने, आनंदाने आणि आध्यात्मिक भावनेने साजरा केला जाणारा खास उत्सव आहे. दसरा म्हणजे नवरात्रीच्या ९ दिवसांच्या उत्सवाची सांगता होते. दसरा हा सण वाईट प्रवृत्तीवर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे. हा सण आपल्या राष्ट्रीय एकात्मतेला बळकट करतो आणि विविधतेतील एकता या संकल्पनेवरील आपला अढळ विश्वास दृढ करतो. आज जेव्हा जग असहिष्णुता, व्देष आणि हिंसाचाराने पिडीत असताना आम्ही सहिष्णुता, बंधुता आणि शांततेच्या मुल्यांप्रती कटीबध्द होऊया.

 हा महत्त्वाचा प्रसंग आपण उत्साहाने आणि नवीन उमेदीने साजरा करूया, ज्यामुळे आपल्याला एकत्र राहण्यास आणि आनंदाचे आणि परिपूर्णतेचे जीवन जगण्यास मदत होईल.

दसऱ्याचा हा शुभ सोहळा गोव्यातील जनतेला अधिकाधिक समृद्धी आणि शांती घेऊन येवो असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.