Connect with us

गोवा खबर

शैक्षणिक ध्येयांसाठी वचनबद्ध राहा: आलेक्स सिक्वेरा

Published

on

Spread the love


गोवा खबर :कायदा आणि न्यायमंत्री श्री. आलेक्स सिक्वेरा यांनी विद्यार्थी समाजाला त्यांच्या शैक्षणिक उद्दिष्टांसाठी कटिबद्ध राहून जीवनात उच्च यश मिळविण्याचा सल्ला दिला. श्री सिक्वेरा काल रवींद्र भवनात दक्षिण गोवा जिल्हा मडगाव स्कूल कॉम्प्लेक्स कॉऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने आयोजित वार्षिक सत्कार कार्यक्रमात बोलत होते.

मंत्री श्री. सिक्वेरा यांनी विद्यार्थ्यांनी वाईट सवई पासून दूर राहिले पाहिजे आणि आपल्या अभ्यासात उत्कृष्टता गाठावी असे सांगून त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षक वर्गाच्या भल्यासाठी सुरू केलेल्या उपक्रमाबद्दल दक्षिण गोवा जिल्हा मडगाव स्कूल कॉम्प्लेक्स कॉऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या प्रयत्नांचे कौतुक केले. ते म्हणाले की संस्थेच्या उपक्रमामुळे शिक्षकांना आधार मिळतो आणि सहकारी क्षेत्राच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही योगदान मिळते. यावेळी मंत्र्यांनी शैक्षणिक उत्कृष्टतेबद्दल सत्कार केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचा सत्कार केला.

समग्र शिक्षा अभियानाचे राज्य समन्वयक, श्री. जॉन सिल्वेरा यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकासासाठी विविध प्रयत्न सुरू करण्यावर भर दिला. तरुण विद्यार्थ्यांना विविध तांत्रिक कौशल्यांनी सुसज्ज केल्यास ते आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.

पतसंस्थेचे उपाध्यक्ष श्री. तुळशीदास देसाई यांचे यावेळी भाषण झाले.

अध्यक्ष श्री. बाबाजी सावंत यांनी दक्षिण गोवा जिल्हा मडगाव शाळा संकुल पतसंस्थेतर्फे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

 संस्थेचे सचिव श्री संदिप रेडकर, खजिनदार श्रीमती लॉरेन्सिया रिबेलो आणि इतर सदस्य कार्यक्रमास उपस्थित होते.