Connect with us

गोवा खबर

‘स्मार्ट सिटी’अंतर्गत सर्व प्रकल्पांची चौकशी व्हावी

Published

on

Spread the love

उदय मडकईकर यांची मागणी

 

गोवा खबर : राजधानी शहरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत हाती घेतलेल्या सर्व प्रकल्पांची सखोल चौकशी व्हावी. विशेष करून शहरात बसवलेल्या स्मार्ट कॅमेर्‍यांची चौकशी करावी, अशी मागणी माजी महापौर तथा नगरसेवक उदय मडकईकर यांनी केली आहे.

स्मार्ट सिटी घोटाळ्याप्रकरणी इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास महामंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी संचालक स्वयंदीप्त पाल चौधरी यांची स्मार्ट
सिटी घोटाळ्यांप्रकरणी सखोल चौकशी करावी, अशी मागणी आपण गेल्या पाच वर्षांपासून करत होतो. परंतु त्याची दखल घेण्यात आली नव्हती. अखेर त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार विरोधी पथकाने गुन्हा नोंदवल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

चौधरी याची चौकशी झाली तर इतर प्रकरणेही समोर येतील. त्यांनी अनेक कारनामे केले असून मनाला येतील त्यांना सल्लागार म्हणून नेमले जायचे. 87 लाखांपेक्षाही हा घोटाळा मोठा आहे. शहरात बसलेल्या सीसीटीव्ही कॅमरा बसवण्यास आपण महापौर म्हणून विरोध केला होता, याकडेही मडकईकर यांनी लक्ष वेधले.

स्माटर्र् सिटीअंतर्गत पणजीत 250 सीसीटीव्ही कॅमरे बसवले आहेत. या एका कॅमेर्‍याची किंमत 1 कोटी रुपये असल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी विधानसभेत केला होता. या आरोपांसह कामांचा दर्जा तपासावा. स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांसह सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी मडकईकर यांनी केली.