Connect with us

गोवा खबर

पॅरालिम्पिक : पुरुषांच्या उंच उडी प्रकारात रौप्यपदक मिळवल्याबद्दल मोदी यांनी केले निषाद कुमारचे अभिनंदन

Published

on

Spread the love

गोवा खबर : पॅरालिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या उंच उडी T47 स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज निषाद कुमारचे अभिनंदन केले.

पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमवरील पोस्ट मध्ये लिहिले, पॅरालिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या उंच उडी T47 स्पर्धेत रौप्यपदक जिंकून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल निषाद कुमारचे अभिनंदन. दृढ निश्चय आणि जिद्द यांच्या जोरावर सर्वकाही शक्य आहे, हे निषादने आपल्याला दाखवून दिले आहे. भारत आनंदी आहे.