Connect with us

गोवा खबर

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेजर ध्यानचंद यांना वाहिली आदरांजली

Published

on

Spread the love

गोवा खबर : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांना आदरांजली वाहिली.

आज  ट्विट संदेशात पंतप्रधानांनी क्रीडाक्षेत्रामध्ये उत्कटतेने योगदान देणाऱ्या आणि जगातील मंचावर भारताचे अत्यंत अभिमानाने प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वांच्या कार्याचे मोल जाणून त्यांचे महत्त्व अधोरेखित केले.

प्रत्येक तरुण भारतीय खेळ खेळण्याची आणि या क्षेत्रात चमकण्याची आकांक्षा पूर्ण करू शकेल अशी परिसंस्था निर्माण करण्यासाठी सर्व स्तरांवर क्रीडा क्षेत्राला पाठबळ देण्याप्रती सरकारच्या कटिबद्धतेचा पंतप्रधान मोदी यांनी पुनरुच्चार केला.