Connect with us

गोवा खबर

प्रसार भारतीतर्फे मोफत डीटीएच डिश सेवा

Published

on

Spread the love

गोवा खबर : प्रसार भारती डीडी फ्री डिश नावाने भारतातील सर्वात मोठे आणि एकमेव मोफत डायरेक्ट-टू-होम (डीटीएच) प्लॅटफॉर्म चालवत आहे. सध्या डीडी फ्री डिश 381 टीव्ही चॅनेल आणि 48 रेडिओ मोफत पुरवते आणि देशभरातील अंदाजे 5 कोटीपेक्षा जास्त घरांमध्ये हे चॅनल पाहतात. डीडी फ्री डिश चॅनेल दर्शकांकडून कोणतेही मासिक शुल्क आकारण्यात येत नाही. त्याची सेवा आयुष्यभर विनामूल्य आहे.

डीडी फ्री डिश सेट-टॉप-बॉक्स आणि लहान आकाराचा डिश अँटेना खरेदी करण्यासाठी फक्त एक वेळ 1500 रूपये भरावे लागतात आणि तो सर्व ठिकाणी सहज उपलब्ध आहे.

सध्या डीडी फ्री डिशमध्ये शैक्षणिक चॅनेल आणि सामान्य मनोरंजन, बातम्या, भक्ती, चित्रपट आणि क्रीडा आदी लोकप्रिय खाजगी टीव्ही चॅनलसह दूरदर्शन चॅनल आहेत. ’डीडी स्वयं प्रभा’, ’डीडी पीएम ईविद्या’ आणि ’डीडी डिजीशाला’ चॅनलसारख्या शैक्षणिक चॅनलचा त्यात समावेश आहे. देशभरातील सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांना कला, विज्ञान, वाणिज्य, कला, सामाजिक विज्ञान आणि मानविकी विषय, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कायदा, वैद्यक, कृषी इत्यादी विविध विषयांचे ज्ञान मिळते. यावरील सामग्री एनसीईआरटी, सीआयईटी, आयआयटीस आणि यूजीसीद्वारे दिली जाते.